कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक - नागपुर या शासनमान्य शैक्षणिक संस्थेचे संलग्नित..
अधिक माहिती
१) संस्कृत परिचय.
संस्कृत भाषा ही सर्व भारतीय भाषा तसेच प्रमुख विदेशी भाषांचे मूळ किंवा उगमस्थान आहे. प्राचीन काळी भारतात संस्कृत भाषा बोलली जात असे . या भाषेतच वेदवाङ्मय, रामायण, महाभारत, विविध शास्त्रीय ग्रंथ, काव्य, नाटके, कथा इत्यादी विपुल साहित्य निर्माण झाले. ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
संस्कृतची लिपी देवनागरी आहे. आपली मराठीचीही तीच लिपी असल्याने तिची मूळाक्षरेसुद्धा सारखीच आहेत. संस्कृतमध्ये एकूण ४६ मूळाक्षरे आहेत. त्यात स्वर व व्यंजने असे दोन भाग पडतात.
संस्कृत भाषा फार अवघड, क्लिष्ट आहे अशी एक समजूत आहे. अर्थात त्यात काही तथ्य नाही. कारण कोणतीही भाषा सोपी किंवा अवघड अशी नसते. तर तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जसा असतो त्यावर ते अवलंबून असते...
संस्कृतमध्ये करिअर--: व्याकरण तत्वज्ञान संस्कृत आणि परदेशी भाषा संशोधनाची संधी संस्कृत आणि संगणक प्रसारमाध्यमा मध्ये फायदा शासकीय नौकरी मध्ये संधी स्वतंत्र व्यवसाय उदा. पौरोहित्य ,किर्तनशास्त्र ,संगीतशास्त्र , कला , हार्मोनियम ,तबला , मृदंगवादन
२) पौरोहित्य.
भारतातला सनातन वैदिक धर्म हा श्रुतिस्मृति-पुराणोक्त धर्म मानण्यात आला आहे. म्हणून श्रुती (वेद) व स्मृती यांच्या बरोबरीने पुराणांना वैदिक धर्माच्या दृष्टीने महत्व आहे. प्रपंच आणि परमार्थ हे जीवनाचे ध्येय प्राप्त करण्यास आवश्यक असलेले सारे ज्ञान पुराणग्रंथात रसाळ आणि रोचक पद्धतीने सांगितलेले आढळते. छांदोग्य उपनिषदात चार वेदांच्या बरोबरीने पुराणांचा उल्लेख केला आहे. ख्रिस्तपूर्व ६व्या शतकातल्या धर्मशास्त्रविषयक ग्रंथात पुराणातले आधार दिलेले आढळतात. यावरून पुराण्वाङ्मय हे किती प्राचीन आहे याची कल्पना येते.
जगात अनेक प्रकारचे लोक आहेत. त्यांच्या भाषा वेगवेगळया आहेत. सर्वजण एकमेकांशी बोलतात. आपल्या मनातले विचार इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी हावभाव, हातवारे, बोलीभाषा तसेच लेखनाचाही वापर केला जातो. सर्व भाषांची लेखनाची पद्धत म्हणजेच लिपी सारखी नसते. कुणाची चित्रलिपी, कुणाची देवनागरी, कुणाची रोमन तर कुणाची आणखी काही. शिवाय प्रत्येक भाषेची बोलण्याची ढब, उच्चारपद्धती निराळी असते. आपण लहानमोठया वाक्यांचा वापर करून, आवाजातील चढउतारांचा वापर करून आपले म्हणणे इतरंसमोर मांडू शकतो. जे बोलण्याचे तेच लेखनाचे. जसे बोलतो तसे लिहूही शकतो.
रामायण, महाभारत आणि भागवत या तीन ग्रंथांचे स्वरूप पुराण, इतिहास आणि काव्य या गुणांनी युक्त आहे. अखिल भारतात प्राचीन काळापासून या तीन ग्रंथांचा फार मोठा प्रभाव सर्वत्र पडलेला दिसून येतो. रामायण हा पौराणिक स्वरूपाचा ग्रंथ आदिकवी वाल्मिकीने लिहिला असून त्यात सात कांडात मिळून चोवीस हजार श्लोक आहेत. महाभारत व भागवत हे ग्रंथ प्राचीन परंपरेनुसार व्यासऋषींनी वेदांची पुनर्व्यवस्था केल्यानंतर आत्मसमाधानासाठी लिहिले.
३) किर्तनशास्त्र कनिष्ठ.
सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वन्तराणि च । वंशानुचरितं चेति पुराणं पञ्चलक्षणम् ॥
हे पुराणाचे लक्षण मानण्यात येते. त्यावरून सृष्टीची उत्पत्ती, संहार निरनिराळे मानववंश, मन्वन्तरे आणि थोर राजर्षींच्या वंशाचा इतिहास हे विषय प्राधान्याने पुराणात आढळतात. त्यांच्या आधारानेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांचे प्रतिपादन पुराणग्रंथात केलेले आहे.
इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् ।
हे वचन यासंबंधात प्रसिद्ध आहे. परंपरेनुसार अठरा प्रमुख पुराणांची एकूण श्लोकसंख्या चाळीस लक्षांपेक्षा अधिक मानण्यात येते . अग्निपुराण वपद्मपुराण हे ग्रंथ ज्ञानकोशाप्रमाणे विविध विषयांच्या माहितीने पूर्ण आहेत. रामायण, महाभारत आणि भागवत या तीन ग्रंथांचे स्वरूप पुराण, इतिहास आणि काव्य या गुणांनी युक्त आहे. अखिल भारतात प्राचीन काळापासून या तीन ग्रंथांचा फार मोठा प्रभाव सर्वत्र पडलेला दिसून येतो. रामायण हा पौराणिक स्वरूपाचा ग्रंथ आदिकवी वाल्मिकीने लिहिला असून त्यात सात कांडात मिळून चोवीस हजार श्लोक आहेत. महाभारत व भागवत हे ग्रंथ प्राचीन परंपरेनुसार व्यासऋषींनी वेदांची पुनर्व्यवस्था केल्यानंतर आत्मसमाधानासाठी लिहिले.
४) किर्तनशास्त्र जेष्ठ - नारदीय व वारकरी संप्रदाय संतवाङ्मयाचे अभ्यास.
पुराणांची एकूण संख्या बरीच मोठी आहे. त्यामध्ये पुढील अठरा पुराणे प्रमुख आहेत. ब्रह्म, पद्म, विष्णु, शिव, भागवत, भविष्य, नारद, मार्कंडेय, अग्नी, ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड आणि ब्रह्मांड. याशिवाय अठरा उपपुराणे आहेत. पुराणांच्या या नामावलीवरून त्यामध्ये शिव, विष्णु व त्यांच्या परिवारातील देवदेवता यांच्या संबंधीचे वृत्तांत असावेत याची कल्पना येऊ शकते. तसेच वेदांचे ज्ञान वाढविण्यासाठी वैदिक विद्वानाने पुराणांचे अध्ययन करण्याची आवश्यकता मानण्यात येते.
५) शास्त्रीय संगीत कला - वादन -तबला -मृदंग -हार्मोनियम शिक्षण.
६) वेदांत प्रकिया ग्रंथ आध्यापन - वेदांत सार , विचार चंद्रोदय , पंचीकरण, विचारसागर , संस्कृतसंभाषण वर्
संस्कृत भाषा व त्यात असलेले वाङ्मय हे भारतीय संकृतीचे उगमस्थान आहे हे सर्वपरिचित आहेच. वेद हे जगातील प्राचीनतम ग्रंथांपैकी प्रमुख ग्रंथ आहेत. मात्र वेदांच्या काळासंबंधी बरेच मतभेद आहेत. युरोपीय पंडित वेदरचनेचा काळ इ. स. पूर्व एक ते दोन हजार वर्षांच्या दरम्यान असावा असे मानतात तर जुन्या विचारसरणीचे भारतीय विद्वान वेद हे अनादि आणि अपौरुषेय आहेत असे मानतात. जगत्, जीवात्मा व परमात्मा यांचे स्वरूप व त्यांचा परस्परसंबंध प्रतिपादन करणे हा उपनिषदांचा प्रमुख विषय आहे. उपनिषदांची ‘तत्वमसि’, ‘अहं ब्रह्मास्मि’, ‘सोऽहम्’, ‘अयमात्मा ब्रह्म’ ही चार महावाक्ये आहेत. त्यांचा अर्थ जाणणे व अनुभविणे हे उपनिषदांच्या अध्ययनाचे ध्येय आहे. १७व्या शतकात शहाजहान बादशहाचा विद्वान पुत्र दारा शिकोह याने उपनिषदांचे फारसी अनुवाद करविले. १८व्या शतकामध्ये आक्वेतिल दुपेरॉं या युरोपीय विद्वानाने त्या फारसी भाषांतरावरूनच लॅटिन भाषांतर केले. त्यानंतर इंग्रजी, जर्मन वगैरे अनेक युरोपीय भाषांमध्ये उपनिषदांची भाषांतरे केली गेली. "उपनिषदांच्या अध्ययनाने माझ्या अंतःकरणास चिरशांती मिळाली. ही चिरशांती माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत हृदयातून दूर होणार नाही." हे जर्मन तत्व शोपेन हाउएर यांचे उद्गार प्रसिद्ध आहेत.